loader
Breaking News
Breaking News
Foto

माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरीचा विल्ये जाकादेवी येथे सुवर्ण महोत्सवी प्रयोग

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्र राज्यातील पहिले कोकणातील सांस्कृतिक व पारंपारिक वारसा जपणारे महिलांचे सादर होणारे नमन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक अध्यात्मिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या संस्थेने निर्माण केलेले माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी. या पहिल्या महिला नमन मंडळाने मुबंई रत्नागिरी या जिल्ह्यात अल्पावधीतच 49 प्रयोग सादर करून सांस्कृतिक व कला क्षेत्रातील आपला महिलांच्या पहिल्या नमनचा ठसा महाराष्ट्र राज्यात उमटवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरुषाच्या बरोबर राहून आपणही काहीतरी करु शकतो हि जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून हे शिवधनुष्य या महिलांनी उचलून आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि जेष्ठ नमनसम्राट लेखक दिग्दर्शक यशवंत वाकडे सागर मायंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्माता साईनाथ नागवेकर, शरद गोळपकर, दादा वाडेकर, वासुदेव वाघे, मदन डोर्लेकर तसेच नेपथ्य रचना करणारे सतोष उर्फ बावा आग्रे कोट लांजा यांच्या सहकार्यामुळेच हे नमन मंडळ एक एक पाऊल पूढे टाकताना दिसत आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी रात्रौ 10 वाजता शिवचैतन्य लोकसेवा प्रतिष्ठान 16 गाव आयोजित नवरात्रौत्सव मंडळ विल्ये जाकादेवी येथे या नमनाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग साजरा होत आहे. संकल्प कला मंच रत्नागिरी या सस्थेने मान्यवरांच्या उपस्थितीत या नमन मंडळाला सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले आहे. तसेच नुकताच आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर या नमन मंडळाने कार्यक्रम सादर केला आहे.

टाईम्स स्पेशल

या नमनामध्ये पूनम गोळपकर, प्रेरणा विलणकर, वेदा शेट्ये, अर्चना मयेकर,ज्योती कदम, माधवी पाटील, आकांक्षा वायंगणकर, वेदा शेट्ये, शितल सकपाळ, विनया काळप, रिमा देसाई, विणा भागवत, रेश्मा शिंदे, समिक्षा वालम, सर्वता चव्हाण, तन्वी नागवेकर, पूर्वा चव्हाण, मनस्वी साळवी, आदिती पवार, शोभना वरवटकर, स्वीटी पावसकर, शिवानी मयेकर, आदिती पवार, निरजा जोगळे, समृध्दी गुरव आदी कलाकार म्हणून आपल्या भूमिका उत्कृष्टरित्या सादर करत आहेत. मुख्य गायिका आकांक्षा वायगणकर यांना साथ संगत करणारे परशुराम घवाळी, साई घवाळी, ढोलकी पार्तेज आंबेरकर हे उत्तम साथ संगत करत आहेत. त्यामुळेच नमन उत्तम सादरीकरण करताना तोच पुरुषी जोश पाहून रसिक श्रोत्येही या कलाकारांना प्रोत्साहन देवून दाद देत आहेत. नवरात्री उत्सवातच या मंडळाने सुरूवात करुन अल्पावधीतच नवरात्री उत्सवातच सुवर्ण महोत्सवी प्रयोग साजरा करत आहेत. या बद्दल सर्वत्र या नमन मंडळाचे कौतुक होत आहे व रसिक श्रोत्ये मंडळाला शुभेच्छाही देत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg