loader
Breaking News
Breaking News
Foto

आरजीपीपीएल, कोकण एलएनजीतील कामगारांची पडताळणी करा! ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात नोंदणीची मनसेची मागणी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी लिमिटेड कंपनीमध्ये विविध कामांसाठी परराज्यातील कामगारांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कामगारांची माहिती स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवून आवश्यक ओळख पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी हे महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प असल्याने येथे काम करणार्‍या कामगारांची अधिकृत माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. कामगारांचे पूर्ण नाव, मूळ गाव, कायमस्वरूपी पत्ता, सध्याचे वास्तव्य, संपर्क क्रमांक आणि त्यांना कामावर घेणार्‍या ठेकेदाराची माहिती नोंदवावी, अशी भूमिका जानवळकर यांनी मांडली. कंपनीत कामगार पुरविणार्‍या ठेकेदारांनी अद्ययावत कामगार यादी ठेवावी. कामगार कामावर रुजू होताना किंवा काम सोडताना नोंदी अद्ययावत कराव्यात. तसेच अधिकृत ओळखपत्र, प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा तपासणी याबाबत काटेकोर व्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांनी समन्वयाने कामगार नोंदणी व ओळख पडताळणीची कायद्यानुसार कार्यपद्धती निश्चित करावी. रोजगारासाठी येणार्‍या कामगारांकडे संशयाने न पाहता, सर्वांसाठी नियमानुसार पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जानवळकर यांनी स्पष्ट केले. औद्योगिक विकासासोबत स्थानिक नागरिकांची सुरक्षितता, सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg