loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखमध्ये सद्गुरू लोकमान्य वाचनालयात ६० दिवाळी अंकांचे होणार वितरण

देवळे (प्रकाश चाळके) - वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच वाचकांना दिवाळी अंकांच्या समृद्ध साहित्यविश्वाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरुख यांच्या वतीने दिवाळी अंक वितरण योजना २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी झाला. या योजनेअंतर्गत वाचकांसाठी तब्बल ६० विविध दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. साहित्य, कथा, कादंबरी, आरोग्य, ज्योतिष, विज्ञान, संस्कृती, मनोरंजन, शेती, सामाजिक विषय, इतिहास आणि वैचारिक लेखन अशा विविध विषयांवरील अंकांचा यामध्ये समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये आरोग्यदीप, ग्रहबोली, नवल, हेर, मास्टर की, दुर्गांच्या देशातून, श्री गजानन आशिष, साहित्य चपराक, सासर माहेर, अक्षरवेध, भविष्य २०२६-२७, जत्रा, अनुराधा, पद्मगंधा, ऋतुरंग, मोहिनी, हंस, ग्रहांकित, फुल मनोरंजन, घरचा वैद्य, वनौषधी, अक्षरदान, शतायुषी, रागिणी, शब्द गांधार, कालनिर्णय, मौज, वाटा भटकंतीच्या, ग्राहक हित, आपले छंद, श्यामसुंदर, किस्रीम, अक्षर, धनंजय, अलका, निनाद, मनोकल्प, धनुर्धारी, उद्गार, शूर सेनानी, अन्नपूर्णा, सांस्कृतिक वार्तापत्र, लोकसत्ता, लोकप्रभा, ॲग्रोवन, मार्मिक, सामना, खेळगडी, ग्रंथ जगत, दक्षता, सुवासिनी, किशोर, एकता, मेनका, माहेर, साप्ताहिक सकाळ, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, सत्याग्रही विचारधारा-मिळून साऱ्याजणी, तथाकथित आणि कुल्फी आदी अंकांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

दिवाळी अंक हे मराठी साहित्यविश्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, त्यातून नव्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळते आणि वाचकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी अनुभवता येते. देवरुखमधील वाचकांना एकाच ठिकाणी विविध विषयांचे आणि वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे दिवाळी अंक उपलब्ध होणार असल्याने या उपक्रमाचे साहित्यप्रेमींकडून स्वागत होण्याची अपेक्षा आहे. वाचकांनी या दिवाळी अंक वितरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाच्या अध्यक्षांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg