loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या स्वरूप महाजन यांची शिवसेना सोशल मीडिया उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती!

दापोली (वार्ताहर) - शिवसेना सोशल मीडियाच्या संघटनात्मक विस्तारात दापोलीच्या स्वरूप नम्रता नंदकुमार महाजन यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना सोशल मीडिया कोकण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये स्वरूप महाजन यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे दापोलीच्या राजकीय आणि सोशल मीडिया क्षेत्रातून स्वरूप महाजन यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य मंत्री योगेश कदम यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वरूप महाजन यांचा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दापोली तालुक्याच्या सामाजिक समस्या, प्रशासकीय अडचणी आणि एकूणच शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहकार्यात्मक कामगिरीचा विचार करून त्यांची पक्षाच्या सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सोशल मीडिया हे आजच्या राजकीय संवादाचे आणि संघटनात्मक संपर्काचे प्रभावी माध्यम बनले आहे. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटनात्मक उपक्रमांना डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे, अशा विविध पातळ्यांवर सोशल मीडिया यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी स्वरूप महाजन यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीकडे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

दापोलीतील स्वरूप महाजन यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडियाचे संघटन अधिक व्यापक करण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे. या निवडीबद्दल स्वरूप महाजन यांचे राजकीय आणि पक्षीय वर्तूळातून अभिनंदन होत आहे. तर, स्थानिक आमदार आणि राज्याचे गृह राज्य मंत्री नामदार योगेश कदम यांनी महाजन यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना सोशल मीडियाच्या गुहागर विधानसभा प्रमुखपदी अमरदीप परचुरे यांची तर गुहागर तालुका प्रमुख म्हणून दिनेश झगडे, गुहागर शहर प्रमुख म्हणून शुभम साखररकर, चिपळूण 72 गाव तालुकाप्रमुख पदी शंतनू चव्हाण तर खेड तालुकाप्रमुख म्हणून आदर्श आंब्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg