रत्नागिरी, : भूजल पातळी टिकवून ठेवणे आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करणे या उद्देशाने क्रेडाई रत्नागिरी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि ग्रामपंचायत मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजोळे येथील पाटीलवाडी परिसरात ब्रिजजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला. काल (ता. १९ ) राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक संस्था, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून जलसंधारणाचा संदेश दिला. या उपक्रमासाठी क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष सुमित ओसवाल आणि मिरजोळे ग्रामपंचायतीचे सरपंच रत्नदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत बंधारा उभारणीच्या कामाला गती मिळाली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी योग्य प्रकारे अडवून त्याचा जमिनीत साठा वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि परिसरातील भूजल पातळीत सुधारणा करणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता. कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाळ्यानंतरच्या काळात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता स्थानिक पातळीवर असे जलसंधारणाचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या वनराई बंधारा बांधकामासाठी आवश्यक असलेल्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या क्रेडाई रत्नागिरीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि त्यांचा वापर करून हा बंधारा उभारण्यात आला.
या कार्यक्रमासाठी क्रेडाई रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी व सदस्य तसेच मिरजोळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी आणि मिरजोळे-पाटीलवाडी येथील ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या श्रमदानातून हा वनराई बंधारा बांधकाम उपक्रम सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांतून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.