loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगर वाचनालयात ७० दिवाळी अंकांचे वाचनासाठी उपलब्ध

खेड : खेड नगर वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचनप्रेमींसाठी दिवाळी अंक वाचनसेवा सुरू करण्यात आली आहे. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वाचनालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यंदा वाचकांसाठी सुमारे ७० विविध दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळी अंकांच्या माध्यमातून साहित्य, संस्कृती, कला, कथा, कविता आणि वैचारिक लेखांचे वाचन करण्याची संधी वाचकांना मिळते. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे होणारे दुर्लक्ष कमी करून वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने वाचनालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना वाचनालयाचे अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. खेड नगर वाचनालयाचे सध्या सुमारे ७०० सभासद असून अधिकाधिक नागरिकांनी वाचनाची आवड जोपासण्यासाठी वाचनालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनातून ज्ञानाची वृद्धी होते आणि ज्ञानातूनच समाजाची प्रगती साधली जाते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी शरद शिर्के, गोविंद राठोड, , संजय खेडेकर, अनिल येसोंडे, ग्रंथपाल श्रीमती बेंडखळे, श्रीमती चितळे, श्रीमती चव्हाण आदी उपस्थित होते. वाचनालयात उपलब्ध असलेल्या दिवाळी अंकांचा वाचक सभासदांसह खेडमधील साहित्यप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg