loader
Breaking News
Breaking News
Foto

‘ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश

पनवेल (प्रतिनिधी) :- रस्ते सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि जबाबदार वाहन वर्तनाबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे ‘ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात चार शाळांमधील ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. न्यू पनवेल येथील एचडीएफसी सर्कलवर रोटरी स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, पळस्पे फाटा येथे बालाजी इंग्लिश स्कूल आणि छत्रपती शिवाजी स्कूल, तर रीस (रसायनी) येथे संजीवनी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फलक, घोषवाक्ये आणि बॅनरच्या माध्यमातून वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचा संदेश दिला. हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि रस्त्यावर जबाबदारीने वागणे यामुळे अपघात टाळण्यास मदत होते, हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी शाळा, शिक्षक आणि रोटेरियन यांनी सहकार्य केले, अशी माहिती क्लबचे सचिव रोटेरियन ऍड. हितेश राजपूत यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg