संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुचरी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या माधवी गिते यांनी विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यात माभळे गणाचे पंचायत समिती सदस्य सुहास मायंगडे आणि मुचरी गणाच्या पंचायत समिती सदस्या आरुषी घवाळी सहभागी झाल्या होत्या. या संयुक्त दौऱ्यामध्ये फणसवळे, काटवली, कुळे, वाशी, सोनवडे, बोरसूत, लोवले, तेन्ये, मुचरी, ओझरखोल, निढळेवाडी, माभळे, नावडी, कुरधुंडा, आंबेड बुद्रुक, वांद्री, कोळंबे, मानसकोंड आणि कानरकोंड या गावांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या दौऱ्याला गावागावांतून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रामुख्याने पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, पिण्याच्या पाण्याचे स्रोत टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर कसा करता येईल, याबाबत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. काही गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या किरकोळ दुरुस्त्या, पाण्याच्या स्रोतांमधील गाळ काढणे, तसेच आवश्यक ठिकाणी नवीन विंधन विहिरी (बोअरवेल) घेण्याची मागणी नागरिकांनी केली. या कामांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्या माधवी गिते यांनी सांगितले. याशिवाय यंदाच्या कमी पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे झालेल्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले आहेत की नाही, याची माहिती घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत, त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत शासकीय यंत्रणेकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले.
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून विजय बंधारे व अन्य जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. मुचरी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक नियोजन करावे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या उपाययोजनांची माहिती पोहोचवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. गावभेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर संबंधित विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले. या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष गावात येऊन संवाद साधत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.