loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा एटीएस पासिंगमधील जाचक अटी शिथिल करा आणि अवैध रेंटल्स रोखा; सिंधुदुर्ग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे आरटीओला निवेदन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर टू-व्हीलर व मोटर बाईक रेंटल व्यवसायावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नव्याने सुरू झालेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (ATS) द्वारे रिक्षा पासिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून शिथिलता देण्यात यावी, या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक-मालक प्रतिनिधींनी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर यांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सचिव प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची भेट घेऊन निवेदन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​२१ ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन कार्यालयात एटीएस (ATS) मशीनद्वारे वाहनांचे पासिंग सुरू करण्यात आले आहे. मात्र, या प्रणालीमध्ये रिक्षा पासिंग करताना हँडब्रेक, स्पीडोमीटर व फायर किटबाबत तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, कुशल चालकांकडून चाचणी न घेतली गेल्याने रिक्षा व्यवस्थित पास होत नसल्याची तक्रार रिक्षाचालकांनी केली. शिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हँडब्रेक केबल, स्पीडोमीटर केबल आणि फायर किट सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनावश्यक तांत्रिक गोष्टींची सक्ती न करता पूर्वीप्रमाणेच मोटार वाहन निरीक्षकांमार्फत चाचणी घेऊन पासिंग करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच, एकदा ८०० रुपये फी भरून रिक्षा फेल झाल्यास त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा नव्याने ८०० रुपये फी न आकारता पासिंग करून द्यावे, अशी विनंतीही शिष्टमंडळाने केली.

टाईम्स स्पेशल

​यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, एटीएस मशीन व त्याचे ऑपरेटर नव्याने रुजू झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात काही दिवस आवश्यक ती ॲडजस्टमेंट केली जाईल, असे स्पष्ट केले. ज्या गोष्टी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाहीत, त्यांची नाहक सक्ती केली जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि रिक्षा पासिंग सुलभ करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ​या आश्वासनानंतर शिष्टमंडळातील सर्व रिक्षा चालक-मालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांचे आभार मानले, तसेच रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येणार नाही याची दक्षता घेण्याची विंनती केली. या शिष्टमंडळात मालवण तालुका रिक्षा संघटना आणि कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg