loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा खेड तालुक्याच्या वतीने ‘दीपोत्सव २०२६’चे आयोजन; किल्ला, कंदील आणि रांगोळी स्पर्धांची पर्वणी!

खेड - भाजपा युवा मोर्चा, खेड तालुक्याच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून ‘दीपोत्सव २०२६’ या भव्य सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच युवकांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून आनंद, उत्साह, संस्कृती आणि आपल्या परंपरांचा वारसा जपणारा सण आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांमध्ये सांस्कृतिक जाणीव निर्माण व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच पारंपरिक कलांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दीपोत्सवांतर्गत किल्ला स्पर्धा, आकर्षक आकाशकंदील स्पर्धा आणि सुंदर रांगोळी स्पर्धा अशा तीन प्रमुख स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना आपले कलाकौशल्य, कल्पकता आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३,००० रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २,००० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. कंदील स्पर्धेत अनुक्रमे ३,०००, २,००० आणि १,००० रुपये, तर रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे २,०००, १,५०० आणि १,००० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

टाईम्स स्पेशल

आजच्या आधुनिक युगात आपल्या पारंपरिक सणांचे महत्त्व टिकवून ठेवणे, युवकांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि खेड तालुक्यातील स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण विचार आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासोबतच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटण्यास निश्चितच मदत होणार आहे. या ‘दीपोत्सव २०२६’ उपक्रमात खेड तालुक्यातील नागरिकांनी, युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा, खेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg