loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डेतील अपहृत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मुंबईत शोध; संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात! रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी शोधमोहीम

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईतून शोध घेतला आहे. या प्रकरणातील संबंधित युवकासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अपहृत मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे सावर्डे परिसरात निर्माण झालेल्या चिंतेच्या वातावरणाला दिलासा मिळाला आहे.रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावर्डे, ता. चिपळूण येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने सावर्डे येथे घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस (खेड विभाग), सुरेश कदम (लांजा विभाग), सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी शोधपथके तयार करण्यात आली.दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे सावर्डे परिसरात निर्माण झालेली चिंता आणि तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने उपाययोजना केल्या. घटनास्थळी क्यू.आर.टी. (QRT) पथके तैनात करण्यात आली. सावर्डे पोलीस, चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली.

टाइम्स स्पेशल

अखेर १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुंबई येथून अपहृत मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या संबंधित युवकाचा शोध घेण्यात यश आले. मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले असून, संबंधित युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.ही शोधमोहीम प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg