loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात आणि परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गिम्हवणे येथील श्री. गजानन महाराज मंदिर संपूर्ण परिसर शेकडो पणत्या आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. भाविकांनी मंदिरात आणि परिसरात रांगोळ्या काढून पणत्यांची आरास केली होती. आकर्षक रोषणाई व दीपप्रज्वलनाने सारा परिसर लखलखीत झाला होता. सकाळपासूनच श्री गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आणि महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गिम्हवणे तसेच आसपासच्या परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg