loader
Breaking News
Breaking News
Foto

पारपोली दागिने चोरी प्रकरणी दोन संशयित ताब्यात : एक दिवसाची पोलीस कोठडी

सावंतवाडी : तालुक्यातील पारपोली येथे अंगाला मालिश करण्याचा बहाणा करून घरकाम करणाऱ्या महिलेच्या ६५ वर्षीय पतीची फसवणूक करत ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी कुडाळ येथून ताब्यात घेतले. सुभाष प्रल्हाद चव्हाण (वय ३६) आणि संभाजी रामचंद्र चव्हाण (वय ५२, दोघे रा. रूपडी, हातकणंगले, कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, दोन्ही संशयितांना सोमवारी २ नोव्हेंबर रोजी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरचा प्रकार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास पारपोली गावठणवाडी येथे घडला होता. फिर्यादी रमेश केशव परब (वय ६५) हे आपल्या पत्नीसह घरी असताना दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले होते. त्यातील एकाने फिर्यादीला हातापायाचे मालिश करून देतो असे सांगून विश्वासात घेतले आणि पायाला मालिश करत गळ्यातील सोन्याची चैन काढून बाजूला ठेवायला सांगितली. त्यानंतर ते दोघेही व्यक्ती मोटारसायकलवरून निघून जाताना बाजूला काढून ठेवलेली सुमारे १० ग्रॅम वजनाची आणि ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लबाडीने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ​घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस अंमलदार ९८३ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष शिंदे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, पोलिसांनी आंबोली तसेच दाणोली बाजार व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांनी वापरलेली दुचाकी व वर्णनानुसार व्यक्ती दिसून आल्या. त्यानंतर दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता, संबंधित व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कुटुंबाकडे चौकशी केली असता, ते कुडाळ येथे गेल्याचे समजले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी कुडाळ येथील एका लॉजमधून दोघांनाही ताब्यात घेतले; मात्र त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg