loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : एसटी प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय असून महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी ९ कोटी ७३ हजार १९५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे.तृतीयपंथीयांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसह राज्यातील विविध विभागांमधील बसस्थानकांचा या योजनेत समावेश आहे. यासाठी ९ कोटी ७३ हजार १९५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, नांदेड तसेच विदर्भातील भंडारा आणि यवतमाळ विभागांचाही यात समावेश आहे. प्रत्येक स्वच्छतागृह सुमारे सहा चौरस मीटरचे असेल. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वीजजोडणीसह एका युनिटसाठी सुमारे २.४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg