loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस-दांडेली येथील १७ दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

आरोस- आरोस-दांडेली येथे १७ दिवस मनोभावे पूजलेल्या गणरायाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या १७ दिवसांपासून गावातील घराघरांत भक्तीमय वातावरण होते. घराघरातील आकर्षक आरास, सजावट तसेच विविध हालते देखावे यामुळे गणेशोत्सवाची रंगत वाढली होती. १७ दिवसांच्या उत्सवानंतर गणरायाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी महिलांनी फुगड्या खेळत उत्साहात सहभाग घेतला. तसेच आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात १७ दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg