loader
Breaking News
Breaking News
Foto

खापणे महाविद्यालयाच्या 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष्य

तुषार पाचलकर (राजापूर): राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दत्तक गाव पाचल येथे एनएसएस सप्ताह अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचल ग्रामपंचायतचे सदस्य श्री विनायक सक्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीस्थळाजवळून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाचल बाजारपेठ, आझाद टेकडी परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर , ग्रामसचिवालय परिसर, पाचल बस स्थानक परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या परिसरातील प्रचंड प्लास्टिक आणि इतर कचरा स्वयंसेवकांनी कचरा गाडीत भरून पाठवला.

टाइम्स स्पेशल

यावेळी बॉटल अलग करून त्यांची वेगळी विल्हेवाट लावण्यात आली. 'स्वच्छता ही सेवा ' या अभियानात पाचल ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. आत्माराम सुतार, पाचल ग्रामपंचायतचे सदस्य श्री. संजय पाथरे, श्री. विनायक सक्रे, दर्शना जाधव, माजी उपसरपंच श्री. किशोर नारकर, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी.एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा.एस. जी. चव्हाण, प्रा.पी. पी. राठोड ग्रामपंचायत अधिकारी श्री. संतोष चव्हाण, कर्मचारी श्री. कल्पेश सुतार, श्री. नंदकुमार पांचाळ,श्री. सुभाष काळे आदींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या परिसरातील कचरा गोळा करून हा परिसर सदैव स्वच्छ केला राहिला पाहिजे असा संदेश दिला . यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता करण्याची शपथ घेतली.विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्वच्छतेचे परिसरातील नागरिकांतून आणि व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg