loader
Breaking News
Breaking News
Foto

दुर्गादेवी मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मांडवी चौपाटी मार्गावरील वाहतुकीत बदल; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आदेश

रत्नागिरी, : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी समुद्रकिनारी दि. २० व २१ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्रित येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मांडवी समुद्रकिनार्‍याकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, काही मार्गांवर वाहतूक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मांडवी चौपाटीवर विसर्जनासाठी अंदाजे ५ ते ६ हजार नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणी पार्किंग व वाहतुकीची अडचण निर्माण होऊ नये म्हणून केवळ देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी येणार्‍या वाहनांनाच मांडवी चौपाटीपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्व प्रकारच्या खासगी व प्रवासी वाहनांना समुद्रकिनारी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. २० व २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री १२ या कालावधीत लागू राहील. वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे : बंद मार्ग : भुतेनाका - भडंगतिठा ते मांडवी हा मार्ग सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णतः बंद राहील. एकेरी वाहतूक : मांडवी समुद्रकिनारा ते नाईक फॅक्टरी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहील. पर्यायी मार्ग : बंद करण्यात आलेल्या मार्गाऐवजी वाहनांना भुतेनाका - मिरकरवाडा तिठा - मत्स्यालय ते नाईक फॅक्टरी मार्गे ये-जा करता येईल.

टाईम्स स्पेशल

सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच मंत्री महोदयांच्या दौर्‍याच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिकृत परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही. याशिवाय निकडीच्या आणि तातडीच्या प्रसंगी घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार निर्णय घेतील. दरम्यान, या वाहतूक बदलाबाबत वाहन चालक, मालक किंवा नागरिकांना काही आक्षेप अथवा हरकती असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवाव्यात. पुढील अधिसूचना जारी करताना प्राप्त हरकतींचा योग्य विचार करण्यात येईल, असेही पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg