पनवेल :- भारतीय अभिजात संगीताची समृद्ध परंपरा, किराणा घराण्याच्या गायकीचे लोभस सौंदर्य आणि सुरेल स्वरांच्या अविस्मरणीय अनुभूतीने ठाण्यातील सहयोग मंदिर येथे आयोजित ‘१८ वा पंडित फिरोज दस्तुर स्मृती संगीत समारोह’ रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. पंडित फिरोज दस्तुर मेमोरिअल ट्रस्ट आणि उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय संगीत महोत्सवात नामवंत गायकांच्या शास्त्रीय गायनासह संतूर आणि संवादिनी वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता आली. रायगडचे सुपुत्र सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांच्या सुमधुर, दमदार आणि भावपूर्ण गायकीने विशेष रंगत आणली. रागांची भावपूर्ण मांडणी, स्वच्छ आलापी आणि तानांच्या नजाकतीतून त्यांनी रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली.
पं. उमेश चौधरी यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात ‘राग मधुवंती’ने केली. या रागातील ‘ए वो मोरे साई’, ‘लागी लागी रे’ आणि ‘रंग रलीया करत’ या बंदिशी त्यांनी सुरेल अंदाजात सादर केल्या. प्रत्येक बंदिशीतील भाव, रागाचा विस्तार आणि स्वरांवरील पकड यांतून त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची प्रचिती आली. त्यानंतर ‘राग कामोदी मल्हार’मधील ‘मोरा भाग सुहाग तुम्ही से’ ही रचना सादर करत त्यांनी आपले गुरू उस्ताद अस्लम खान यांना भावपूर्ण स्वरवंदना अर्पण केली. तसेच गुरूमाई विदुषी शुभदाताई पराडकर यांच्या शिकवणीतील पैलूंची आठवण त्यांनी करून दिली.त्त्या अनुषंगाने गुरूंच्या सांगीतिक संस्कारांचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी मनापासून दाद दिली. ‘राग मेघमल्हार’मधील ‘गरज गरज आज मेघ’ या बंदिशीने उमेश चौधरी यांच्या गायकीचा विशेष प्रत्यय दिला. त्यांच्या खुल्या, खड्या आवाजातील स्वच्छ आलापी, सुरांवरील विलक्षण पकड आणि तानांची अप्रतिम नजाकत यामुळे रागाचे भावविश्व रसिकांसमोर जिवंत झाले. स्वरांच्या चढ-उतारांतून आणि रागाच्या प्रभावी मांडणीतून त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत मैफलीची रंगत वाढवली. त्यांना तबल्यावर गिरीश नलावडे आणि संवादिनीवर सिद्धेश ठक्कर यांनी उत्तम साथसंगत केली.
महोत्सवाच्या अंतिम सत्रात पंडित विनोद डिग्रजकर यांनी ‘राग मारुबिहाग’, ‘राग मधुकंस’ आणि ‘राग रंगेश्वरी’मधील विविध बंदिशी सादर करत आपल्या समृद्ध गायकीची छाप उमटवली. अखेरीस ‘इतना तो करना स्वामी’ ही भैरवी सादर करून त्यांनी महोत्सवाची सांगता केली. त्यांना स्वप्नील भिसे आणि सिद्धेश बिचोलकर यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी शिंदे यांनी केले, तर गिरीश संझगिरी यांनी आभार मानले. समारोपप्रसंगी पंडित फिरोज दस्तुर यांच्या दुर्मीळ ध्वनिमुद्रिका ऐकवून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.चार दिवसांच्या या संगीत महोत्सवाने अभिजात संगीताची समृद्ध परंपरा रसिकांसमोर उलगडली. विशेषतः पं. उमेश चौधरी यांच्या गायकीने गुरू-शिष्य परंपरेतील सांगीतिक संस्कार, रागदारी संगीताचे सौंदर्य आणि सुरांच्या साधनेतील निष्ठा यांचा प्रत्यय देत मैफलीत संस्मरणीय स्वरानुभव निर्माण केला.


























































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.