रत्नागिरी - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व कोकणातील एक नामवंत पत्रकार श्री. बाळासाहेब पाटणकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. हुस्नआरा पाटणकर यांचे आज गुरुवारी पहाटे वृद्धापकाळामुळे देहावसान झाले. निधनसमयी त्यांचे वय सुमारे ८८ इतके होते. सौ. हुस्नआरा पाटणकर यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजताच रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांची रीघ सुरु झाली. सौ. हुस्नआरा पाटणकर यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून वृद्धापकाळातील आजारपणामुळे काहीशी नरमगरम होती. त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरु होते. परंतु आज सकाळी त्यांची प्रकृती वैद्यकीय उपचारांना साथ देईनाशी झाली व त्यांचे देहावसान झाले. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त काही वेळातच सर्वत्र सर्वत्र पसरले आणि मग त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आप्तेष्ट व स्नेहीजनांची रीघ लागली.
त्यांचे पती श्री. बाळासाहेब पाटणकर हे महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांचा नेहमी अखिल भारतीय स्तरावरील नेत्यांमध्ये वावर असे, त्यामुळे बॅ. नाथ पै, माजी खासदार मधु दंडवते, प्रमिला दंडवते, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे अशा मोठ्या नेत्यांची त्यांच्या घरी सदैव ये-जा असे. हुस्नआरा पाटणकर त्या सर्वांचे सदैव हसतमुखाने आदरातिथ्य करीत. त्यांच्या मागे त्यांचे पती श्री. बाळासाहेब पाटणकर व मुलगा श्री. अतिफ पाटणकर, सून सौ. नेहा पाटणकर व नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी २ वाजता कोकणनगर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सौ. हुस्नआरा पाटणकर यांना दै. रत्नागिरी टाइम्सच्या चेअरपर्सन तसेच श्रीराम मंदिर संस्था व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले, ‘सौ. हुस्नआरा पाटणकर यांच्या घरी कार्यकर्त्यांचा व बड्या नेत्यांचा सदैव राबता असे, त्या सर्वांचे हसतमुखाने आदरातिथ्य करीत. त्यांचा स्वभाव हसतमुख होता, त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. अत्यंत कठिण काळातही त्या हसतमुखाने सर्वांचे स्वागत करीत. त्यांना आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली’ असे त्यांनी सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.