loader
Breaking News
Breaking News
Foto

संदीप सासने यांना धर्मपालक पुरस्कार प्राप्त

खेड - आपल्या हिंदू संस्कृती.परंपरा आणि सनातन धर्माच्या संवर्धनासाठी करीत असलेल्या अमूल्य आणि अविरत सेवेचा गौरव करण्या साठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने श्री संदीप नारायण सासने यांना अत्यंत आदराने आणि अभिमानाने शाल श्रीफळ "धर्मपालक" गौरव पुरस्कार पत्र व मराठा साम्राज्याची मराठा मूठ तलवार प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संदीप सासने यांनी गेली ३५ वर्ष किल्ले रसाळगड येथील शिव जयंती उत्सव अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी केलेला त्याग तसेच खेड शहरात शिवतर रोड येथे शिमगा उत्स, दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव, नवरात्रोत्सव सुरू केलेत. त्याचबरोबर खेड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर स्थापन करून नाना विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद, पालखी सोहळा, त्याच बरोबर तालुक्यातील गड किल्ले यांची महती "आम्ही इतिहासाचे साक्षीदार" या अंकाद्वारे तर "ब्रम्हांड नायक" अंकाद्वारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिराची माहिती प्रसिध्द करून सकल हिंदू समाजाचे लक्ष वेधून घेतले. संदीप सासने हे गेली ४ वर्ष खेड ते अक्कलकोट धर्मध्वज घेऊन पाई वारी करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg