loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत नवरात्रोत्सवात सामाजिक जनजागृती, दुर्गामाता मंडळाचा 'महिला सक्षमीकरणा'चा संकल्प

वैभववाडी (प्रतिनिधी) - नवरात्रोत्सवात आदिशक्तीची आराधना करतानाच मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि महिलांच्या सन्मानाचा सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी यांच्यावतीने राबविण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेश देत मंडळाने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृतीचा संकल्प केला. ​यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, सचिव संजय रावराणे तसेच मंडळाचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवरात्र उत्सवाला रविवारी प्रारंभ झाला.तालुक्यात सार्वजनिक नवरात्र उत्सवासह मंदिरातून हा कार्यक्रम होत आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या 'नवदुर्गा' उपक्रमाला पाठिंबा देत शहरातील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाने हा सामाजिक संदेश दिला. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकता, जनजागृती आणि महिला सक्षमीकरणाचे माध्यम ठरावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. ​समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, बालविवाह रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा आणि महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg