loader
Breaking News
Breaking News
Foto

मिलिंद चाचे यांच्या ३ वर्षाच्या अथक संघर्षाला यश, रत्नागिरीत डीपीडीसीच्या माध्यमातून भव्य शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मंजूर

आबलोली (संदेश कदम) - रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणार्‍या हजारो विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अखेर एक मोठी ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी गेल्या ३ वर्षापासून केलेल्या सातत्यपूर्ण आणि चिकाटीच्या पाठपुरावाला मोठे यशआले असून, रत्नागिरीमध्ये शासकीय स्पर्धापरीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. या महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्पासाठी मिलिंद आत्माराम चाचे दीर्घकाळ राजकीय व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला, या प्रवासात त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून शासनाकडे २२ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रथम अधिकृत मागणी केली होती. तसेच विद्यमान आमदार काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही या जनहितार्थ मागणीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री आणि प्रशासनकडे आपले शिफारस पत्र देऊन त्वरित निधी मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली होती. तसेच मुंबई महापालिका मधील तत्कालीन नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे (संपर्कप्रमुख साखरपा, लांजा, राजापूर विधानसभा मतदारसंघ) यांनी ही मिलिंद आत्माराम चाचे यांच्या विनंतीला मान देऊन आमदार किरण सामंत यांच्याकडे याविषयी मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रांची, विद्यार्थ्यांच्या गरजेची, आणि विविध स्थानिक संस्थांच्या पाठबळाची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री,नामदार उदयजी सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) या युपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयाबाबत मिलिंद आत्माराम चाचे यांनी पालकमंत्री, नामदार उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत, तसेच प्रवासात खंबीर पाठबळ देणारे तत्कालीन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते विद्यमान आमदार भाई जगताप, त्यांचे बंधू, भाऊ जगताप यांनाही त्यांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत. नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे यांनाही धन्यवाद दिले आहेत. या मागणीला मोलाचे सहकार्य आणि अधिकृत समर्थन देणार्‍या निर्मल ग्रामपंचायत पाचेरी सडा, निर्मल ग्रामपंचायत कुडली बंदरवाडी, माध्यमिक विद्यालय कुडली, आणि द मॉडेल इंग्लिश हायस्कूल सैतावडे या सर्व संस्थांचे आणि ग्रामपंचायतचे मिलिंद आत्माराम चाचे यांनी आभार मानले असून त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

टाईम्स स्पेशल

फक्त अभ्यासिकाच नाही तर मिळणार तज्ञ मार्गदर्शन: या मंजुरीमुळे रत्नागिरी मधील या मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यांना केवळ बसून अभ्यास करण्याची जागाच (अभ्यासिका) मिळणार नाही, तर नामांकित तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित वर्ग, स्पर्धा परीक्षांचे अद्यावत पुस्तकेआणि प्रशासकीय अधिकार्‍यांची विशेष सत्रे आयोजित केले जातील. यासाठीचा सर्व निधी डीपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब हुशार विद्यार्थ्यांनाआता स्पर्धा परीक्षेच्या(युपीएससी, आणि एमपीएससी, बँकिंग) तयारीसाठी जिल्हा बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. गेली ३ वर्ष सातत्याने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष केल्याबद्दल, रत्नागिरी जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि मिलिंद आत्माराम चाचे यांना धन्यवाद दिले आहेत आणि समाधान व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg