loader
Breaking News
Breaking News
Foto

ढोक्रवली अंगणवाडीत बालकांना फळवाटप; सेविका व मदतनीसांचा सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील अंगणवाडीत बालकांना फळवाटप करून त्यांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, भाजपा चिपळूण तालुका पश्चिम ग्रामीण तालुकाध्यक्षा वैष्णवी राजे शिर्के आणि भाजपा ओबीसी सेल उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बालकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमाला माजी सरपंच सलोनी गावकर, ग्रामविकास अधिकारी निलकंठ रुपनर, कृष्णा मोहिते, गणपत राणे यांच्यासह अंगणवाडीतील बालके, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg