loader
Breaking News
Breaking News
Foto

नायरी रोडवरील कातकरी आंबा येथे भीषण अपघात; दुचाकी-चारचाकीची समोरासमोर धडक, दोघे जखमी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील नायरी रोडवरील कळंबस्ते येथील कातकरी आंबा परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. या अपघाताची तीव्रता इतकी होती की चारचाकीच्या उजव्या बाजूचे टायर फुटून रींग बाद झाली, तर दुचाकीचा पुढील टायर फुटून त्याची रिंग वाकली यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ नायरी मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिकेत घोरपडे यांच्या ताब्यातील दुचाकी (गाडी नंबर मिळू शकला नाही) आणि नितेश घोरपडे यांच्या ताब्यातील एमएच ४६ डीएफ ०१२५ क्रमांकाची चारचाकी यांच्यात कातकरी आंबा येथील वळणावर समोरासमोर धडक झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात अनिकेत घोरपडे यांच्या उजव्या पायाला, तर करण यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धडकेत चारचाकीच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले असून दुचाकीचा पुढील टायर फुटून रिंग वाकली आहे. वाहनांची झालेली ही अवस्था पाहता धडक जोरदार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, दोन्ही वाहनांचा वेग किती होता, हे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. कातकरी आंबा येथील वळणावर हा अपघात झाल्याने या ठिकाणी वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

टाईम्स स्पेशल

अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर आल्याने संगमेश्वर-नायरी मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. दरम्यान, दोन्ही वाहने एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अपघाताची पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद झाली आहे किंवा नाही, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg