loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला सभापती-उपसभापतींची भेट

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी ०९ ऑक्टोबर रोजी (शुक्रवारी) तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यसेवेचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी येथील आरोग्य सेवेत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आलेल्या रुग्णांची विचारपूस करून आपल्याला मिळणारी सेवा कश्या प्रकारे दिली जात आहे याबाबतही चौकशी केली. याठिकाणी आवश्यक असणार्‍या सुधारणा करून अधिकाधिक चांगली सेवा कश्या प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना यावेळी सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी येथील वैद्यकीय अधिकारी प्रफुलकुमार कांबळे यांना दिल्या. यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे व भाजपचे तालुका सेक्रेटरी सचिन ओक, डॉ.भारत शेळके,आरोग्य सहाय्यक मदन जानवळकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg