मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित डिलाईल रोड वरील एनटीसीच्या बंद पोदार मिल कामगारांनी आज ना.म.जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास राणे यांना लेखी निवेदन देऊन, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपासमारीचे जीवन जगणारे कामगार आपल्या जीवाचे बरे वाईट करतील, असा कडक इशारा दिला आहे. दोनच दिवसापूर्वी टाटा मिलच्या कामगारांनी भोईवाडा पोलीस स्टेशनला अशाच आशयाचे निवेदन दिले होते. पोद्दार मिलच्या कामगारांनी आपल्या उपासमारीवरील निवेदन पोलीस स्थानकात दिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
दिनांक ७ सप्टेंबर पासून १२ महिन्याचा पगार त्वरित द्या! या प्रमुख मागणीला समोर ठेवून अन्य मागण्यांसाठी १)पोद्दार मिल २) इंदू मिल क्रमांक पाच ३) टाटा आणि ४) दिग्विजय या चार गिरण्यांच्या कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेल्यास महिना (३१ दिवस) लोटला तरी व्यवस्थापनाने अजूनपर्यंत तरी समाधानकारक प्रस्ताव समोर न आणल्यामुळे कामगारांमध्ये निराशेचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. गेली पाच वर्षे या गिरण्या बंद आहेत. कामगार हलाखीचे जीवन जगत आहेत. या गिरण्यातील कामगारांच्या मुलांची लग्नकार्य थांबली आहेत, मुलांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे. कामगार नेते आणि विधान परिषदेचे उपनेते सचिन अहिर यांनी एक महिन्यापूर्वीच केंद्र शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ या प्रश्नावर न्यायालयातही लढतो आहे.
आता ना.म. जोशी मार्गावरील पोलीस स्थानकाने कामगारांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असा आग्रह राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, संघटन सेक्रेटरी बबन आसवले आणि प्रतिनिधीनी, कार्यकर्त्यांनी केला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, लवकरच हा प्रश्न मार्गी नाही लागला तर कामगार एनटीसीच्या प्रधान कार्यालयावर मोर्चा नेतिल. कामगारांना गतवर्षाची ग्रॅच्युईटी, बारा महिन्याच्या पूर्ण पगार आणि उर्वरित राहिलेला पगार मिळालाच पाहिजे, अशा घोषणा उपोषणकर्त्या कामगारांनी दिल्या आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.