loader
Breaking News
Breaking News
Foto

रिक्षा हस्तांरणासाठी आरटीओ कार्यालयात लाच घेतल्याच्या प्रकरणात क्लार्कची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज मागवले

पनवेल : रिक्षा हस्तांतरणासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त साडेचार हजार रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पनवेल आरटीओ कार्यालयातील एका अधिकार्‍यासह क्लार्कची चौकशी केली आहे. या प्रकरणात एका एजंटला सप्टेंबरमध्ये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. आता तपासासाठी आरटीओ कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खारघर येथील आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर सप्टेंबरमध्ये एसीबीने ही कारवाई केली होती. रिक्षा हस्तांतरणाच्या कामासाठी एजंटने साडेचार हजारांची मागणी केल्याची तक्रार केली होती. यातील तीन हजार रुपये आरटीओ अधिकार्‍यासाठी, तर पंधराशे रुपये क्लार्कसाठी मागितले होते. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने एजंटला लाच घेताना पकडले. त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरटीओ अधिकारी आणि क्लार्क यांची चौकशी केली आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg