loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगला सुमधुर संगीताचा कार्यक्रम; सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिरात आयोजन

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनघा गोगटे यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. ​कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री एकमुखी दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धार्मिक वातावरणात अनघा गोगटे यांच्या सुश्राव्य संगीताची भर पडली. त्यांनी सादर केलेल्या विविध भक्तीगीते, भावगीते आणि शास्त्रीय गायनाला रसिकांनी मनापासून दाद दिली. ​या प्रसंगी सबनीसवाडा परिसरातील नागरिक, दत्तभक्त आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिभाव पाहावयास मिळाला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर उपस्थित भक्तांनी आयोजकांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg