loader
Breaking News
Breaking News
Foto

पालीच्या गावकऱ्यांचे कौतुकास्पद पाऊल, एकाच दिवशी नदीवर श्रमदानातून उभारले 2 वनराई बंधारे

वेळणेश्वर - पाणी अडवा, पाणी जिरवा' या केवळ घोषणा न राहता, जेव्हा गावकरी एकत्र येतात, तेव्हा दुष्काळावर कशा प्रकारे मात करता येते, याचं एक आदर्श उदाहरण गुहागर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाली ग्रामपंचायतीमध्ये समोर आलं आहे. यावर्षी पावसाने लवकर दडी मारल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शेती संकटात आली असताना, दुसरीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावण्याची मोठी भीती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाली पेजलेवाडी,नलावडे वाडी येथील गावकऱ्यांनी प्रशासनाच्या सोबतीने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. येथील गावकऱ्यांनी एकत्र येत अत्यंत मोलाचं श्रमदान करून पाली तव्हीचा डोह येथे दोन वनराई बंधारे यशस्वीरीत्या उभारले आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढणार असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा आणि गुराढोरांना पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

या लोकसहभागाच्या आणि कौतुकास्पद कार्यात ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण पेजले, उपसरपंच गौतम गमरे,ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत गोरीवले, पोलिस पाटील नलावडे मॅडम,माजी पोलिस पाटील,तसेच पाली पेजलेवाडीचे असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या एकत्रित श्रमदानातून साकारलेला हा वनराई बंधारा ग्रामीण पातळीवर जलसंधारणाची चळवळ बळकट करणारा आणि 'स्वावलंबी ग्रामविकास' या संकल्पनेला खरी दिशा देणारा ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg