loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमधून ४३ वर्षीय इसम बेपत्ता

पनवेल : पनवेल मधील तक्का येथील मोराज रिव्हरसाइड पार्क येथून सचिन विलास सुर्यगंध (४३) हे बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी त्यांच्या पत्नी नमिता सुर्यगंध यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सचिन सुर्यगंध हे बीएमसी, मुंबई येथे कामाला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बेपत्ता सचिन यांचा रंग सावळा, उंची सुमारे ५ फूट ६ इंच, मध्यम बांधा, गोल चेहरा असून डोक्याचे केस काळे-पांढरे आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट, काळी पॅन्ट आणि चप्पल परिधान केली होती. ते मराठी व हिंदी भाषा बोलतात. सचिन सुर्यगंध यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार तेजश्री अरुण काशिद करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg