loader
Breaking News
Breaking News
Foto

दुष्काळ निवारण व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आरोंदा येथे ‘जलतारा’ कार्यक्रमाचे उद्घाटन

आरोंदा - दुष्काळ निवारण तसेच पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने आरोंदा (रेडकरवाडी)येथे ‘जलतारा’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुश्मिता जाधव व पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. जलतारा कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी संवर्धन, जलसंधारण आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, कार्यकारी अभियंता सुदेश राणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव, शाखा अभियंता डोंगरे, आरोंदा ग्रामपंचायत प्रशासक शुभदा कविटकर, बीआरसीचे अविनाश सावंत, माजी सरपंच सायली साळगावकर, पोलीस पाटील जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी ‘जलतारा’ कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg