loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातील गावधणीत बिबट्याच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण

दापोली (प्रतिनिधी) : गावधणीत बिबटयाचा वावर कमालीचा वाढल्याने गावधणी परिसरातील गावातील रहीवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोली तालुक्यातील गावधणी येथून दापोली शहरातून सारंग कळबंट वाघवे म्हैसोंडे अडखळकडे जाणारा वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. याच गावधणी येथून एक मार्ग ताडील कोंगळे गावांकडे तर दुसरा मार्ग बांधतिवरे वेळवीकडे जाणारा आहे. तसेच दळखण मार्गे दहेण भोमडीकडेही जाणारा मार्ग आहे. अशा या कायम मार्गावर गावधणी येथील सिमेंट काॅक्रिटच्या रस्त्यावरून गुरुवारी मध्यरात्री अगदी बिनधास्तपणे बिबट्या मार्गक्रमण करत असताना या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या निदर्शनास आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा या गावधणी ठिकाणाजवळच बांधतिवरे, भौंजाळी, सारंग, किरांबा, शिवाजी नगर, मौजे दापोली आदी अनेक गावे आहेत. या गावातील रहीवाशांसह येथून जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. अशा या वर्दळीच्या ठिकाणी अगदी बिनधास्त राजरोसपणे बिबटयाचे वावरणे हे मानव जातीला भितीदायक आहे. जंगलांमधील नैसर्गिक शिकार कमी झाल्यामुळे किंवा हद्दीबाहेर आल्यामुळे बिबटे शिवार व लोकवस्तीकडे वळून पाळीव कुत्रे, शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करत आहेत. जंगलतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम झाला आहे. त्याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे. गावधणी येथील परिसरातील बिबट्याचा वाढलेला वावर आणि त्यामुळे येथील रहिवाशांसह येथून जाणाऱ्या मार्गावरील प्रवाशांना बिबट्याचा धोका पोहोचू नये यासाठी वन विभागाने वेळीच खबरदारी घ्यावी रहिवासी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी गावधणी येथील रहिवासी शंकर मायदेव यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg