loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

साटेली भेडशी, (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता, करुणा आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोडामार्ग येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शेकडो धम्म अनुयायी, महिला-भगिनी आणि समाजबांधव उपस्थित होते. महासंघाच्या कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका शाखा तसेच गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत मंगल कार्यालय, आंयी रोड, दोडामार्ग येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात वंदनीय भन्ते सचित बोधी (अध्यक्ष, सम्यक संकल्प बहुउद्देशीय संस्था) यांनी प्रमुख धम्मदेशना दिली. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष आयु. व्ही. ए. कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाजकल्याण सभापती रुहिता राजेश तांबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महासंघाचे सल्लागार आयु. रमाकांत कृ. जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर दोडामार्ग तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. शंकर म. जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली. महासंघाच्या उपासकांनी सामूहिक त्रिसरण व पंचशीलाचे पठण केले. महासंघाचे दिवंगत पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या दोडामार्ग तालुका शाखेचे उपाध्यक्ष आयु. अर्जुन आयनोडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर केंद्रीय अध्यक्ष व्ही. ए. कदम, सरचिटणीस बी. एस. कदम आणि खजिनदार गोपाळ जाधव यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यात महासंघाच्या माजी तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांमधील सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान, पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच बौद्धाचार्य आणि श्रामणेर यांचा सन्मान करण्यात आला. वंदनीय भन्ते सचित बोधी यांच्या उपस्थितीत सामूहिक धम्मदीक्षा कार्यक्रमही संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुरेश कदम व मोहन परुळेकर, सरचिटणीस बी. एस. कदम, खजिनदार गोपाळ जाधव, चिटणीस राजन पावसकर व गुरुनाथ बांदेकर, सावंतवाडी तालुका शाखाध्यक्ष टिळाजी जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष अनिल पावसकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रेमानंद जाधव, गोवा विभागाच्या उपाध्यक्ष वासंती परवार, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका ज्योती जाधव, सावंतवाडी महिला विभागाच्या अध्यक्ष प्रज्ञा जाधव, भारतीय बौद्ध महासभा दोडामार्ग तालुका शाखाध्यक्ष बुद्धभूषण हेवाळकर, भारतीय बौद्ध महासभा राजरत्न दोडामार्ग तालुका शाखेचे सचिव हरिश्चंद्र मणेरीकर, श्रामणेर अर्जुन कदम, सावंतवाडी शाखेचे सल्लागार तथा उपासक नारायण आरोंडेकर आणि महाराष्ट्र राज्य बौद्ध महिला संघाचे संस्थापक गणपत पन्हळेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासंघाच्या दोडामार्ग तालुका शाखेचे सचिव संदीप आनंद जाधव यांनी केले, तर खजिनदार प्रकाश कांबळे यांनी आभार मानले. या सोहळ्यास महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग शाखांचे पदाधिकारी, गोवा विभाग, महिला विभागाच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, बौद्धाचार्य, श्रामणेर, विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दोडामार्ग तालुका शाखेने केलेले सुनियोजित आयोजन आणि व्यवस्थापन याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg