देवळे (प्रकाश चाळके) - ज्येष्ठ कलावंत आणि समाजसेवेच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे स्वर्गीय नाना पाटेकर यांना देवळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साखळी बंधारे उभारून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. केवळ शब्दांतून श्रद्धांजली न वाहता, त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा आदर्श समोर ठेवून प्रत्यक्ष जलसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरणसंवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. चार वर्षांपूर्वी स्व. नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन च्या माध्यमातून देवळे गावात मोठे काम करण्यात आले होते. ग्रामसमृद्धी अभियान, देवळे यांच्या वतीने गणेश मंदिर, देवळे येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाम फाउंडेशनच्या सहकार्याने चार वर्षांपूर्वी कडा ते करंजारी सीमा या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या ओढ्यातील गाळ उपसा आणि खोलीकरण करण्यात आल्याच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या जलसंवर्धनाच्या कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून देवळे गावाला पाणीटंचाई आणि पुराच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
जलसमृद्धी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी स्व. नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरणा घेत साखळी बंधारे उभारून त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प केला. त्यानुसार सकाळी बंधार्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याच ठिकाणी शोकसभा घेऊन स्व. नाना पाटेकर यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील विद्यार्थी व शिक्षक, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळे येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागातून जलसंवर्धनाचे महत्त्व अनुभवले. समाजहितासाठी एकत्र येऊन केलेले कार्य हीच दिवंगत समाजसेवकाला खरी श्रद्धांजली ठरू शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जलसमृद्धीच्या कार्यात मोलाचे योगदान देणारे कै. गजानन मोघे, कै. शरद साडविलकर, कै. चंद्रकांत गुरव आणि इतर दिवंगत कार्यकर्त्यांनाही यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावाच्या जलसमृद्धीसाठी योगदान देणार्या या कार्यकर्त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी केले. ग्रामसमृद्धी अभियानाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुसूदन तथा भाई भुर्के ,मावळणकर गुरुजी, राजेश कोळवणकर आणि अभियानाचे अध्यक्ष निलेश कोळवणकर यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी जलसमृद्धी अभियानाचे अध्यक्ष निलेश कोळवणकर, उपाध्यक्ष संतोष विठोबा परशेट्ये, सचिव सुबोध करकरे, सदस्य यशवंत घागरे, डॉ. गणेश देसाई, रमेश शिंदे गुरुजी, चंद्रकांत साळवी, विश्वनाथ साळवी, योगेश साळवी, चंद्रकांत जाधव, किशोर पाथरे, दिलीप पवार गुरुजी, विजय चव्हाण, संजय डाफळे, बंड्या कानसरे, मंदार परशेटे व नवतरुण उत्साही मंडळ वाणिवाडीचे कार्यकर्ते, पोलीस पाटील विजित साळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंगाराम घुमकर, यांच्यासह ग्रामस्थ आणि अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बंधारे उभारण्याच्या या उपक्रमातून देवळे ग्रामस्थांनी एक महत्त्वाचा आदर्श घालून दिला आहे. दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांच्या समाजोपयोगी विचारांना कृतीची जोड दिल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, हेच या अनोख्या श्रद्धांजलीतून अधोरेखित झाले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.