loader
Breaking News
Breaking News
Foto

मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसचे उपोषण सुरू; हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची माहिती

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा नगरपंचायतीने केलेल्या मालमत्ता करवाढीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या करवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालमत्ता करवाढीवर हरकती नोंदविण्यासाठी असलेली १५ नोव्हेंबरची मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील गणपत शेडगे यांनी दिली. मालमत्ता करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, अनेक मालमत्तांवर अव्वाच्या सव्वा कर वाढ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कर आकारणीसाठी करण्यात आलेला सर्व्हे चुकीचा असून, प्रत्यक्ष मालमत्तेची परिस्थिती आणि आकारण्यात आलेला कर यामध्ये तफावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर आकारणीचा सर्व्हे पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. करवाढीचा फेरविचार करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणीही करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, करवाढीच्या प्रश्नावर नुकतीच हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत वाढीव कर आकारणीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हरकती दाखल करण्यासाठी अधिक मुदत देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर १५ नोव्हेंबरऐवजी आता ३० नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील शेडगे यांनी दिली. एकीकडे काँग्रेसचे बेमुदत उपोषण सुरू असताना दुसरीकडे नागरिकांकडून सर्व्हे पुन्हा करण्याची मागणी होत असल्याने म्हसळ्यातील मालमत्ता करवाढीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता नगरपंचायत प्रशासन या वाढीव करवाढीबाबत काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg