loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार भास्कर जाधव यांच्याकडून दिवाळी फराळाचे स्नेहपूर्ण निमंत्रण; १० नोव्हेंबरला चिपळूणमध्ये आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : राजकारण आणि समाजकारणात गेली ४३ वर्षे कार्यरत असताना अनेक संघर्षांचा सामना केला. मात्र, या प्रवासात अनेक मित्र, सहकारी आणि हितचिंतकांची मोलाची साथ लाभली. याच स्नेहबंधांना अधिक दृढ करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी दिवाळीनिमित्त मित्रपरिवार, सहकारी आणि कार्यकर्त्यांना स्नेहभोजन व फराळाचे आपुलकीचे निमंत्रण दिले आहे. दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. यानिमित्ताने दिवाळीच्या फराळाचा आनंद सर्वांसोबत साजरा करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाही मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी विशेष निमंत्रण दिले आहे. आपल्यासारख्या सहकार्‍यांबरोबरच सामान्य जनतेशी वर्षानुवर्षे जुळलेली घट्ट नाळ हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे आमदार जाधव यांनी आपल्या निमंत्रण पत्रात नमूद केले आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनातील संघर्षाच्या प्रवासात अनेक सहकारी प्रत्येक चढ-उतारात सोबत राहिले, त्यांच्या स्नेहाची आणि मैत्रीची जाणीव कायम असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ’सुवर्ण भास्कर’, पागा-जोषी आळी, चिपळूण येथे या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्याला मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg