साटेली भेडशी, (प्रतिनिधी) : तिलारी आंतरराज्य प्रकल्पात सुरक्षा रक्षक मंडळ, रत्नागिरीमार्फत मागासवर्गीय समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक म्हणून संधी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उदय केशव जाधव यांनी बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ पासून तिलारी येथील उपविभाग क्रमांक २ च्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हेवाळे, केंद्रे, पाटये व शिरंगे या गावांतील पुनर्वसित कुटुंबांमधील अनेक सुशिक्षित युवक रोजगारापासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या युवकांना तिलारी आंतरराज्य प्रकल्पात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
तिलारी प्रकल्पात सध्या किती मागासवर्गीय सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत, तसेच सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मागासवर्गीयांसाठी किती आरक्षण किंवा कोटा आहे, याची अधिकृत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार प्रकल्पात मागासवर्गीय समाजातील केवळ एकच सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतर समाजातील उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून संधी दिली जात असेल, तर मागासवर्गीय समाजातील पात्र बेरोजगार युवकांनाही नियमानुसार समान संधी मिळावी. पुनर्वसित गावांतील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या मागण्यांसंदर्भात उपविभागीय अधिकारी, तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २, कोनाळकट्टा यांच्यासह जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग; पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागासवर्गीय बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी आणि सुरक्षा रक्षक भरतीतील वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, या मागण्यांसाठी उदय केशव जाधव यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याने आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.