संगमेश्वर / सत्यवान विचारे : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान परिसरात शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. डोंगरावरून अचानक कोसळलेला दगड डोक्यात पडल्याने सांगली येथील अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले. देवदर्शनासाठी आनंदाने आलेल्या कुटुंबावर नियतीने असा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगली येथील आठ जणांचे कुटुंब शुक्रवारी मार्लेश्वर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर तसेच धबधब्याचा आनंद लुटून माघारी परतत असताना देवस्थान परिसरातील डोंगरावरून अचानक तीन ते चार दगड खाली कोसळले. त्यातील एक मोठा दगड सहा वर्षीय मुलीच्या डोक्यात आदळल्याने ती गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेत अन्य दोघांनाही दुखापत झाली.घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मार्लेश्वर ते देवरुख दरम्यानच्या प्रवासात चिमुकली जिवंत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. एका क्षणात हसत-खेळत असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या हृदयद्रावक घटनेने मार्लेश्वर देवस्थान परिसरात येणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आणि लहान मुले येतात. मात्र, डोंगरावरून अचानक दगड कोसळण्याचा धोका असेल, तर केवळ देवदर्शनाची व्यवस्था पुरेशी ठरणार नाही; भाविकांच्या जीविताची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे.दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये, यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. देवस्थान समिती, संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे संपूर्ण परिसराची तातडीने पाहणी करावी. विशेषतः डोंगराच्या कडेला असलेले सैल दगड, दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि भाविकांची वर्दळ असलेले मार्ग यांचे सुरक्षा परीक्षण करणे आवश्यक आहे.
धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक जाळ्या, अडथळे आणि आवश्यकतेनुसार संरक्षक भिंती उभाराव्यात. धोक्याच्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावून प्रवेश नियंत्रित करावा. पावसाळ्यात तसेच अतिवृष्टीच्या काळात दरड किंवा दगड कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने विशेष दक्षता घ्यावी. आपत्कालीन मदत व्यवस्था, प्राथमिक उपचार सुविधा आणि तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होईल, अशी यंत्रणाही सज्ज ठेवणे आवश्यक आहे.आज एका निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. तिच्या कुटुंबावर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मात्र, या दुर्घटनेतून प्रशासन आणि देवस्थान व्यवस्थापनाने वेळीच धडा घेतला नाही, तर भविष्यात आणखी एखाद्या कुटुंबावर अशीच वेळ येऊ शकते.मार्लेश्वराचे दर्शन भाविकांना आनंद आणि समाधान देणारे असावे; जीव मुठीत धरून दर्शन घेण्याची वेळ येऊ नये. एका चिमुकलीचा बळी गेल्यानंतर तरी भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ठोस उपाययोजना होणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.