loader
Breaking News
Breaking News
Foto

पेजे महाविद्यालयाकडून सागरी सेतू स्वच्छता अभियानांतर्गत गावखडी समुद्रकिनारा स्वच्छ

रत्नागिरी - श्रमिक किसान सेवा समिती संचलित, रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आज दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी सागरी सेतू स्वच्छता अभियानांतर्गत गावखडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच गौतम पाटील यांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.अमित पवार यांनी सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे महत्त्व सांगितले. स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपण आपले सामाजिक योगदान अधोरेखित करीत असतो.असे मार्मिक बोध त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबध्द काम करून ही मोहीम यशस्वी केली.

टाईम्स स्पेशल

स्वयंसेवकांनी किनारी भागात असणारे प्लास्टिक तसेच इतर टाकाऊ घटक एकत्र करून आपले बहुमोल योगदान दिले. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांनी पूर्णगड किल्ला स्वच्छता करून महाराष्ट्राची ओळख असणारे गड-किल्ले आणि संस्कृती जपण्याचे काम या उपक्रमातून केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.ओंकार लिंगायत यांच्या पाठिंब्यासोबतच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात आले. गावखडी ग्रामपंचायतीचे सरपंच गौतम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून अभियानाची यशस्वी सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg