loader
Breaking News
Breaking News
Foto

रिस येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

रसायनी (आनंद पवार) - रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या विद्यमाने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सम्यक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महामानवांना अभिवादन करण्यासह बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगला. सुप्रसिद्ध कवी-गायक महेंद्र जाधव, मिलिंद मोहिते आणि पार्टी यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर, गुन्हे शाखेचे गिरीश नगरकर, प्रसिद्ध उद्योजक प्रवीण खंडागळे, दीपक इंगळे, महादेव कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध धम्माच्या रीतिरिवाजानुसार त्रिशरण, पंचशील आणि बुद्धवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी महामानवांच्या विचारांना अभिवादन करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-गायक महेंद्र जाधव, मिलिंद मोहिते अजित कडलक आणि पार्टी यांनी आपल्या बहारदार बुद्ध-भीम गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात रेखाताई गायकवाड, अश्विनीताई गायकवाड, प्रकाशशेठ गायकवाड, सुनील निकाडे, पत्रकार आनंद पवार, वृषालीताई कांबळे आणि अ‍ॅड. संगीता पाठारे यांनीही सुंदर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या संगीतमय कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भीम अनुयायांनी गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमात सृष्टी निलंगे हिने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करणारे मनोगत व्यक्त केले. आपल्या छोटेखानी मनोगतातून तिने धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी विचार मांडत उपस्थितांची वाहवा मिळवली.

टाईम्स स्पेशल

संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत सर्वांनी मोलाचे योगदान दिले. परिसरातील भीम अनुयायांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून महामानवांच्या विचारांचा जागर, बौद्ध संस्कृतीचे जतन आणि बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आठवणी कायमस्वरूपी कोरल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे दाजीबा तायडे, अशोक गायकवाड, मोहन कांबळे, चंद्रकांत निलंगे, गणेश जावळे, संपत पाठारे, प्रदीप तायडे, धम्मपाल खंदारे, भीमसेन गायकवाड, प्रवीण गायकवाड, संदीप वानखेडे आदी पदाधिकार्‍यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg