मालवण, (प्रतिनिधी) : “बालकांचे आरोग्य हे आपल्या समाजाच्या भवितव्याशी जोडलेले आहे. बालकांना लहानपणापासूनच सकस आणि पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या विविध स्थानिक भाज्या, कडधान्ये, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात समावेश केला पाहिजे. स्थानिक आणि पारंपरिक आहारपद्धती आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात,” असे प्रतिपादन मालवणच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी काळसे येथे बोलताना केले. राष्ट्रीय पोषण माह अभियान आणि सेवा संकल्प महाअभियानांतर्गत मालवण तालुक्यातील काळसे येथील नमसवाडी अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन करून अभियान उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
अभियानाच्या निमित्ताने अंगणवाडी केंद्राच्या वतीने महिला व मातांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पौष्टिक आहारावर आधारित पाककला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचा समावेश होता. या उपक्रमातून पौष्टिक आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि कुपोषणमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण पुढे म्हणाल्या की, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत आणि महिला यांचा सहभाग या अभियानाला अधिक प्रभावी बनवतो. प्रत्येक कुटुंबाने आपल्या आहाराबाबत जागरूक राहून निरोगी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा प्रमुख उद्देश बालकांमधील कुपोषण कमी करणे, गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा आहे. या उपक्रमातून महिलांमध्ये पोषण आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी उलका हजारे, पर्यवेक्षिका भगत, ग्रामसेविका शेलटकर, ग्रामपंचायत सदस्य सुजाता परब, मोनिका म्हापणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अंगणवाडी सेविका वैशाली प्रभू व शांती महाजन यांनी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.