loader
Breaking News
Breaking News
Foto

या बेबंदशाहीला देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे.: राज ठाकरे

मुंबई : राजधानी दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच जंतर मंतरच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना दिल्ली पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे म्हणाले, "No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत. हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg