loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूखात ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ, लाखोंचे दागिने केले लंपास

देवरूख, ११ नोव्हेंबर (वार्ताहर) ः देवरूख बागवाडीमध्ये भरदिवसा मोठी घरफोडी करत चोरट्यानी दिवाळी साजरी केली आहे. या चोरीत सोन्या-चांदींच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस दलानी कंबर कसली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, देवरूख पोलीसांसमोर या घरफोडीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत व रोकड अशी ३ लाख ५१ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. देवरूख बागवाडी येथे घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात योगिता रविंद्र फेफडे (वय ४०, रा. श्रीराम नारायण कदम यांचे भाड्याचे घर, बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी कठीण हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर हॉलमधील लोखंडी पत्र्याच्या कपाटातील लॉकर फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात ६० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ८० हजार रुपयांचा सोन्याचा हार, सोन्याची कानातली, चांदीचे पैंजण, बाळाच्या चांदीच्या बाळ्या, चांदीची जोडवी, वाटी, ब्रेसलेट, मंगळसूत्र यांसह १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. दरम्यान देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा शोध देवरूख पोलीस घेत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg