loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प . सदस्य श्री प्रमोद गांधी साहेब यांच्या पुढाकाराने गिमवी शाळेतील विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून गिमवी जिल्हा परिषद शाळेला पाण्याचा पंप देण्यात आला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गिमवी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन प्रमोद गांधी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून शाळेला पाण्याचा पंप उपलब्ध करून दिला. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी पाणी सहज उपलब्ध होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेत यापूर्वीही प्रमोद गांधी यांच्या वतीने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले होते. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी व्हावा तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यदायी सवयी लागाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आणि शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रमोद गांधी यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg