loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथे 'पाणी अडवा, पाणी जिरवा'चा संदेश; वणौशी व वडवाडीत पावसाचे पाणी संवर्धन प्रात्यक्षिक उत्साहात

​दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण जागरुकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत 'कृषिस्नेही' गटातर्फे वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वडवाडी आणि वणौशी येथे पावसाचे पाणी संवर्धन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ​यावेळी विद्यार्थ्यांना व तज्ज्ञांनी उपस्थितांना पावसाचे पाणी अडवणे, साठवणे आणि भूजल पुनर्भरणासाठी वापरण्याच्या विविध आधुनिक व सोप्या पद्धती समजावून सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने: ​छतावरील पाणी संकलन, ​अस्तरीकरण केलेले शेततळे व साठवण विहीर, ​समपातळी बांध व सामुदायिक टाकी, ​रिचार्ज खड्डा ​यांचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः रिचार्ज खड्ड्याची अचूक रचना, त्यातील पाण्याचे विविध थर, पीव्हीसी पाइपचा वापर आणि पावसाच्या सुरुवातीचे अशुद्ध पाणी बाजूला काढण्यासाठी उपयुक्त असलेल्या 'फर्स्ट फ्लश डायव्हर्टर'च्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. ​यासोबतच जलस्रोतांच्या दीर्घकालीन उपयोगासाठी गटार, पाइप, गाळणी आणि साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तलावातील गाळ काढणे, लहान बंधारे उभारणे आणि जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे यांसारख्या उपायांवरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अशा उपायांमुळे पाण्याची नासाडी टळेल आणि कोरड्या कालावधीत तसेच सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

"पावसाचे पाणी संवर्धन ही किफायतशीर आणि पर्यावरणपूरक जलसुरक्षेची प्रभावी पद्धत आहे," असे नमूद करत उपस्थितांना “पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा” या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. ​सदर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. सचिन पाठक, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली कृषिस्नेही गटाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg