loader
Breaking News
Breaking News
Foto

झिराड आदिवासीवाडीत दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप, दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

अलिबाग : दिवाळी सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ चॅरिटेबल ट्रस्ट, झिराड यांच्या वतीने झिराड आदिवासीवाडी येथील आदिवासी बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आदिवासी बांधव दिवसरात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. त्यांच्या जीवनातही सण-उत्सवांचा आनंद निर्माण व्हावा आणि दिवाळीचा गोडवा सर्वांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिलीप भोईर यांनी सर्व आदिवासी बांधवांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे आणि निराशेकडून आशेकडे नेणारा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, आपुलकी व माणुसकीची नाती अधिक दृढ व्हावीत, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे दिलीप भोईर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. यावेळी झिराड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच दर्शना भोईर, झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश माने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे, अशोक थळे, हरेश भोईर, वीरेश खेडेकर, महमद्दअली शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg