loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली घाटात झाड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प; स्थानिक, वन विभाग अन् वाहनधारकांच्या तत्परतेमुळे मार्ग पूर्ववत

माडखोल : आंबोली घाटात नाना पाणी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर, साखळी क्रमांक ३१/९७९ येथे आणि दाणोलीपासून चार किलोमीटर मागे महामार्गावर एक भले मोठे जांभळाचे झाड अचानक कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. हे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, वन विभागाचे जलद प्रतिसाद पथक, स्थानिक नागरिक आणि अडकून पडलेल्या वाहनधारकांनी तत्काळ पुढाकार घेतला. सर्वांनी एकत्र येत महामार्गावर पडलेले झाड बाजूला हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या संयुक्त तत्परतेमुळे झाड हटवण्यात यश आले आणि सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर सकाळी पावणेदहाच्या सुमारास घाटातील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरळीत झाली. ​सध्या आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत आणि सुरळीतपणे सुरू असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg