loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य विभागाची कारवाईची आकडेवारी म्हणजे हत्ती सोडून शेपटीवर कारवाई, हरी खोबरेकर यांची टीका

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे हे मत्स्योद्योग मंत्री झाल्यापासून मत्स्य विभागाने आजपर्यंत अनधिकृत मासेमारी प्रकरणी २४८ नौकावर केलेली कारवाई म्हणजे हत्ती सोडून शेपटीवर केलेली कारवाई आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे. सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत दररोज कर्नाटक, केरळ, मलपी, गुजरात, या परराज्यातील हजारो नौका अतिक्रमण करून येथील मासळी लुटत असताना मत्स्य विभागाने दावा केलेली कारवाईची आकडेवारी अतिशय नगण्य आहे. तसेच या कारवाईत स्थानिक अनधिकृत मच्छिमारांना मत्स्य विभागाने अभय दिले असून स्थानिक अनधिकृत मासेमारी नौकांवर किती कारवाई केली, याची आकडेवारी मत्स्य विभागाने जाहीर करावी, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी दिले आहे. सध्या सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पारंपारिक मच्छिमारांचा अनधिकृत मासेमारी विरोधात संघर्ष सुरु असून या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे हे देवगड बंदरात अनधिकृत पर्ससीन धारकांना अभय देत आहेत का ? असा सवाल करत मत्स्योद्योग मंत्र्यांच्या तसेच मत्स्य विभागाच्या कारभारावर टीका केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडून पालकमंत्री नितेश राणे हे मत्स्योद्योग मंत्री बनल्यापासून आजपर्यंत अनधिकृत मासेमारी प्रकरणी २४८ नौकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध केली. मात्र, मत्स्य विभागाच्या या कारवाईच्या आकडेवारीवर हरी खोबरेकर यांनी आक्षेप घेत टीका केली आहे. मत्स्य विभागाची कारवाई म्हणजे हत्ती सोडून शेपटीवर कारवाई करण्यासारखी आहे. परराज्यातील हजारो हायस्पीड नौका सिंधुदुर्गच्या हद्दीत अतिक्रमण करून राजरोसपणे मासेमारी करत असतात. त्या तुलनेत २४८ हा कारवाईचा आकडा नगण्य असाच आहे. या हायस्पीड नौका पकडण्यासाठी मत्स्य विभागाकडे सुसज्ज गस्तीनौका व सक्षम यंत्रणा नाही. पारंपारिक मच्छिमार सातत्याने समुद्रात दिसणाऱ्या अनेक परप्रांतीय नौका निदर्शनास आणून देत असताना देखील मत्स्य विभाग त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे किरकोळ कारवाईचा आकडा जाहीर करून मत्स्य विभागाने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच मत्स्य विभागाने जाहीर केलेल्या कारवाईच्या आकड्यात स्थानिक अनधिकृत नौका किती आहेत हे मत्स्य विभागाने जाहीर करावे. स्थानिक अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांना मत्स्य विभाग अभय देत आहे, असा आरोप हरी खोबरेकर यांनी केला आहे. तसेच ऍक्सेस पास च्या नावाखाली पारंपारिक मच्छिमारांच्या सागरी हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या स्थानिक पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने कोणती कारवाई केली, किती नौका जप्त केल्या, किती पर्ससीन जाळी जप्त केली, किती नौकांना दंड केला याची माहितीही मत्स्य विभागाने जाहीर करावी, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg