loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची शृंगारतळी येथील नवरात्री उत्सवाला भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी शृंगारतळी येथील दोन्ही नवरात्री उत्सवाला भेट दिली. नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ शृंगारतळी तसेच श्री नीळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ शृंगारतळी येथील मंडळाला सदिच्छा भेट दिली. गुहागर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे हे दोनच दिवसापूर्वी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले होते. नवरात्री उत्सव शांततेत पार पडावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अचानक त्यांनी नवरात्री उत्सव मंडळाला सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठ, शृंगारतळी मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास बेलवलकर यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचा सत्कार केला. यावेळी सचिव श्रीकांत शिर्के, खजिनदार महेंद्र बेलवलकर, जेष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ आण्णा बेलवलकर, भरत विखारे, रामभाऊ सकपाळ, सचिन कोंडविलकर व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्री नीळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ शृंगारतळी येथील मंडळाला देखील पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी भेट देऊन कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेतली. यावेळी महेश शिर्के, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, बापू कोळवणकर, गणेश मोरे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg