loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय कृषी विमा कंपनीचा विमा परतावा न मिळाल्याने ८४ वर्षीय शेतकर्‍याचे कुटुंब उपोषणाला बसणार

खेड (प्रतिनिधी) : भारतीय कृषी विमा कंपनीकडून सन २०२४-२५ सालचे फळपिक विम्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त होऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष दत्ताराम खोपकर यांनी कृषि कार्यालय, खेड येथे दिनांक ०२/१०/२०२६ रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी तालुका कृषि अधिकारी, खेड यांच्यामार्फत जिल्हा कृषि अधिकारी, रत्नागिरी यांना दि. २८/०९/२०२६ रोजी निवेदन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संतोष खोपकर यांचे वडील दत्ताराम नारायण खोपकर (वय ८४ वर्षे), रा. कुळवंडी, ता. खेड यांनी दि. २९/११/२०२४ रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक, खोपी या बँकेतून ११,९६८/- रुपये इतकी आंबा फळबागेची विमा रक्कम भरली होती. त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीने दि. १७/०७/२०२५ रोजी ३५,४२३.५५ आणि ३३,६७७.१७ इतकी रक्कम परतावा म्हणून मंजूर केली आहे. परंतु अद्यापही माझे वडीलांना ती रक्कम मिळू शकलेली नाही.

टाईम्स स्पेशल

संबंधित कंपनीचे तालुका प्रतिनिधी विकास धोत्रे व जिल्हा प्रतिनिधी प्रतीकेश शिवगण यांना अनेक वेळा संपर्क करूनही त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळालेले नाही. तसेच कंपनीचे तालुका आणि जिल्ह्याचे अधिकृत कार्यालय नेमके कोणत्या ठिकाणी आहे हेच समजून येत नाही, असा आरोप खोपकर यांनी केला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दि. ०२/१०/२०२६ रोजी कृषि कार्यालय, खेड येथे उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg